किल्ला भूषणगड.... जबाबदारी
आज भूषणगड, ता. खटाव. अजून एक सूंदर गड. चांगल्या स्थितीतील तटबंदी. दरवाजे ढासळलेले आहेत, पण जे आहेत ते व्यवस्थित आहेत. नेहमीप्रमाणे सकाळी गडावर प्रवेश केला...नजर समोर गेली, त्या काळया पाषाणावर चुन्याने रंगवलेली नावे दिसली, कोणाचे प्रेम कोणावर आहे, कोण कोणावर i love u करत आहे ते समजले, थोडं विषन्न वाटलं, एवढा सोन्यासारखा रायगड बांधून मोबदला म्हणून फक्त जगदेश्वराच्या मंदिराच्या पायरीशी ' सेवेशी तत्पर, हिरोजी इंदुलकर' एवढाच नावाचा उल्लेख करणाऱ्या हिरोजीचे नाव नजरेसमोर तरळून गेले. विचार केला, आपण काय करू शकतो, आम्ही दोघे आणि सोबत आठ छोट्यांची पटावळ. लागलो कामाला.. दरवाज्याच्या भिंती साफ करायला केलं चालू नंतर गड दर्शन केले. सोबत जो मॅप होता, त्याच्या आधारे गडाचा कोपरा नि कोपरा फिरून घेतला तिथं एका ठिकाणी ध्वज स्तंभ होता. कोणत्या तरी शिव प्रेमी संघटनेने त्यावर लावलेला ध्वज खाली पडला होता. गडावरील पाऊस वारा यामुळे तो खाली पडला असावा एक बांबू शोधला. लोखंडी खांब वर असलेली दोरी कापून काढली, उंची पुरेना, मग एकाच्या डोक्यावर दुसरा असे उभे राहिले, जुनी बांधलेली दोरी ...