किल्ल्यावरील 4G communication
आजचा किल्ला .. महिमान गड( ता माण). एक छोटासा किल्ला. छोटीशी तटबंदी, गडावर छोटे मारूतीचे मन्दिर. तटबंदी अजून शाबूत. तसं पहाता ,आज हनुमान जयंती नि महाराजांची पुण्यतिथी.
नुकताच सूर्योदय झालेला. मंदिरासमोर बसलो होतो.
तिथून सहज पश्चिमेस नजर टाकली तर समोर दिसला वर्धनगड (ता. कोरेगाव). वर्धनगडावरून जरंडा(सातारा) आणि नांदगिरी(कोरेगांव) दिसतात, नांदगिरी वरून चंदन(सातारा) आणि वंदन(सातारा) दिसतात, जरंड्यावरून अजिंक्यतारा(सातारा) दिसतो, अंजिक्यताऱ्यावरून सज्जनगड(सातारा) दिसतो. तिथून वसंतगड(कराड) नजरेत पडतो
चन्दन वन्दन वरून पांडवगड(वाई) आणि तिथून कमळगड(वाई) नि केंजळगड(वाई) दिसतात.
तिथून रायरेश्वर(भोर) नजरेस येतो. इथे स्वराज्याची शपथ घेतली गेली वयाच्या सोळाव्या वर्षी. तिथून रोहीडा(भोर) बघता येतो. रोहिड्यावरुन दिसतो राजगड(भोर) आणि तोरणा(भोर), राजगडवरून रायगड, पुरंदर(पुरंदर) आणि सिंहगड(पुणे).
रायगडावरून मधु-मकरन्द गड(महाबळेश्वर) आणि तिथून प्रतापगड(महाबळेश्वर).
पुरंदरवरून त्याचा छोटा भाऊ वज्रगड.
सिंहगडवरून लोहगड
लोहगडावरुन विसापूर, तुंग ,तिकोना, कोरीगड आणि मोरगिरी गड(ता. लोणावळा)
कोरीगडावरून तैलबैला, तिथून सुधागड(जि. रायगड)....
यादी थांबत नाही...
सातारा जिल्हा, माण तालुक्यावरून चालू झालेला माझ्या नजरेचा नजारा कल्पनेत क्षणातच सातारा, महाबळेश्वर, वाई, भोर,पुणे,पुरंदर लोणावळा, रायगड अश्या भागातून फिरून आला
त्या काळातील हि Connectivity मला 4G सारखी परीमाणकरक वाटली. किती थोड्या वेळात माहिती transfer होत असेल ना, निरोप पाठवणं किती सहज, सोपं नि जलद.

Comments
Post a Comment