सिंहगड गळाभेट
*सिंहगड गळाभेट*
एम80 होती त्यावेळी माझ्याकडे. साधारण १९९९ चा काळ. जुलै सोमवार, सकाळ 7 वाजले होते, दोघेही थोडे आळसावलेल्या मनस्थितीमध्ये.आज गाडीवरून कोठेतरी जाऊया, ऑफीसला बुट्टी मारून... चल सिंहगड वर जावूया एम80 घेऊन.... गाडी घाट चढणार का, चल जाऊन तर बघू, जिथपर्यँत जाईल तिथपर्यत जायचं, नि नाही चढली गाडी तर परत रिटर्न.. इतकी माफक अपेक्षा ठेवून निघालो... याच्या आधी कधीच ट्रेकिंग केले नव्हते... Kodak चा कॅमेरा होता... फोटो काढले बरेच... (त्यात सेल्फीची सोय नव्हती )
आमची वजने कमी असल्याने म्हणा किंवा एम80 ही गाडी मजबूत असल्याने म्हणा, एम 80 वर चढली नि आयुष्यात आम्ही पहिल्यांदा सिंहगड सर केला. नंतर फारशी चढाई नाही झाली... पण कधीतरी वर्षातून एकदा असा दौरा चालू झाला..
नि मग हळूहळू प्रेम जडू लागलं गडावर.
मुलं मोठी होऊ लागली.. सुरवातीला बोट धरून गड चढणारी ,जपून चाला रे, अश्या सूचना ऐकत ऐकत सुरवातीच्या काळात चढाईला दीड दीड तास लागणारी हीच मुले पुढे चाळीस मिनिटात गड चढू लागली. गडावरील प्रेम नि निष्ठा इतकी अढळ झाली आहे की, आज जर माझ्या मुलांना मी तीन चॉईस दिले, तुम्हाला या शनिवारी मॅकडी मध्ये पार्टी हवी का सिटी प्राईड चा मुव्हि का सिंहगड ट्रेक..... तर उत्तर एकच असेल, ते म्हणजे सिंहगड!!
गड चढण्याचा एक आगळा वेगळा छन्द जडू लागला, महिन्यातून किमान दोन वेळा तरी गड गाठायचा.पहाटे पाच वाजता घर सोडायचे, सहा वाजता काही करून गडाचा पायथा गाठायचा. सूर्योदय हा गडावरूनच पाहयाचा.
आकाश स्वच्छ असेल तर, खंदकडा च्या बाजूला यायचे, नि समोर स्वराज्याचे दोन खंदे वीर दिसतात ... राजगड नि तोरणा ते नजरेत भरून घ्यायचे. मी इतक्या वेळा हा नजारा पाहिला आहे, तरी मन कधी भरत नाही.
गड चढून झाला की दोन ग्लास सरबत, वाटलं तर मडक्यातील दही म्हणा किंवा थंडगार ताक याचा आस्वाद घ्यायचा.
पुणे दरवाजा एक, दरवाजा दोन नि दरवाजा तीन, अश्या तीन दरवाजातून पुढे जात राहताना, गडाची व्याप्ती समजू लागते, मग पागा, दारूचे कोठार, पुढे आले की हत्तीचा तलाव. एका बाजूस देवटाकं म्हणजे साक्षात अमृत. इतकं गोड पाणी की, आत्मा सुखावून जातो.
दुसऱ्या बाजूस तानाजी मालुसरे यांचा पुतळा. अभिमानाने ऊर भरून यावी अशी जागा. कर्तव्याचा दिव्यत्वाचा पुतळा. त्यामागे डोणगिरीचा कडा, तानाजीने ४ फेब्रुवारी,१६७० ला चढलेला कडा!!
देवटाक्यावरून पुढे जावं, तर येतो कल्याण दरवाजा, कल्याण गावातून वर येणारा. इथून खंदकडा दिसतो नि बाजूस गाडीतळ. कल्याण दरवाजा डाव्या बाजूला टाकून पुढं जावं, तर येते समोर झुंजार बुरुज- माची. संध्याकाळी इथून बसून सूर्यास्त पहावा... केवळ अप्रतिम!
गडावर मारुतीचे एक मंदिर, अमृतेश्वराचे मंदिर. अमृतेश्वराचे मन्दिर म्हणजे गडाचा सर्वात उंच भाग..लोकमान्य टिळकांचा बंगला येथे गडावर रात्री मुक्काम करवयाची सोय आहे.गडावर झुणका भाकर खावी, तेलावर भाजून केलेले वांग्याचे भरीत खावं, पावसाळ्यात भजी खावी.. तटबंदीवरून जाताना खडकवासला दिसते, एका बाजूला वरसगाव धरण दिसते. हा गड दुरून ओळखावयास सोपा. गडावर दोन उंच टॉवर, एक दूरदर्शन नि दुसरा आकाशवाणी. गडाचा आकार कुऱ्हाडीसारखा. हा गड तिन्ही ऋतूमध्ये देखणा.
मेटं आलं की गडाची चढण खडी होते.गड चढावयास थोडा आव्हानात्मक तरी गडाचे आकर्षण इतके निर्माण झाले आहे कि, कधी सायकलवरून पायथा नि मग गड चढाई असा उपक्रम, किंवा गड सलग दोन वेळा चढाई-उतरणी करणे, चाळीस मिनिटात गड चढणे, शेवटच्या टप्प्यात हमखास जास्त चढ असलेले शॉर्टकट घ्यायचे,असे वेगवेगळे उद्योग चालू असतात. K2S म्हणजे कात्रज ते सिंहगड असा सतरा-अठरा डोंगर पार करून कात्रज वरून सिंहगड ला येणारा पौर्णिमेच्या रात्रीचा ट्रेक, हा अजून एक उत्साहवर्धक ट्रेक.
पहाटे साठीसत्तरीतले काही आजी आजोबा ज्या तरुणाईच्या चपळाईने गड चढतात, उतरतात ते पाहून आपल्याला स्फुरण चढते. त्याचवेळी एकादे तरुण जोडपं, जेमतेम दहा टक्के चढून झाले कि आजूबाजूला दमत दमत जेव्हा विचारतात, 'अजून किती राहिला हो गड अजून चढायचा'.. तेव्हा थोडं हसू पण येतं, अश्या लोकांना मग सांगत राहायचे... 'बसू नका, गो स्टेडि, चालत रहा, हे आलाच बघा गड..' ते जोडपं देखील हसतं हे मोटिव्हेशन ऐकून. नि गड नव्या दमाने चढायला लागतं...
पण अश्यावेळी उंच टाचेचे सँडल, शॉर्ट ड्रेस, गळ्यात मोठी पर्स, एक हात सेल्फी काढण्यात दंग , दुसऱ्या हातात साउंड- स्पीकरवर इंग्लिश गाणी मोठया आवाजात...असे कोणी चालताना दिसले की राग येतो,त्यावेळी त्यांना ओरडून सांगावे वाटते.. अरे, हा पार्क नाहीरे, ही एक पवित्र जागा आहे.. तीर्थस्थान आहे ते आमचं. त्याच पावित्र्य राखा.
ही नुसती माती नाही रे, हे नुसते दगड नाहीत रे, हा एक ऊर्जा स्रोत... प्रेरणा स्रोत... आनंद स्रोत!!

Comments
Post a Comment